Monika Lonkar –Kumbhar
पावसाळ्यात आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे, आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे.
या दिवसांमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचेची देखील खास काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे चेहऱ्यावरील मेकअप खराब होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे क्रीम बेस्ड उत्पादनांचा वापर करणे टाळा. चुकून जर वापर केला तर तो ब्लेंड करूनच करा.
पावसाळ्यात जास्त हेव्ही मेकअप करणे टाळा. मेकअपच्या ब्रशची अवश्य स्वच्छता ठेवा
पावसाळ्यात तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप जास्त काळ टिकण्यासाठी सेटिंग पावडरचा अवश्य वापर करा.
लिपस्टिकचे विविध रंग वापरण्यावर महिलांचा नेहमीच भर असतो. पावसाळ्यात डार्क रंगाच्या लिपस्टिकचा वापर करणे हा उत्तम पर्याय असू शकतो.