पावसाळ्यात मेकअप खराब होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी? पाहा..

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात थंडी आणि पावसाचे पाणी यामुळे बऱ्याचवेळा मेकअपसाठी समस्या उद्भवणाऱ्या ठरतात. यामुळे मेकअप खराब होण्याचे चान्सेस असतात.

पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे मेकअपवर परिणाम होतो. परिणामी मेकअप पसरू लागतो आणि पावसात भिजल्याने मेकअप खराब होतो.

पावसाळ्यात मेकअप खराब होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या काही सोप्या टीप्स सांगणार आहोत.त्य

पावसाळ्यात ओलाव्यामुळे चेहऱ्याला घाम येतो. त्यामुळे काही लावण्यापूर्वी चेहरा धुतल्यावर आधी बर्फ लावा त्यामुळे घाम कमी येईल आणि मेकअप टिकून राहील.

मेकअप करण्यापूर्वी प्रायमरचा वापर करा. मेकअप करताना त्याचा नियमित वापर करा त्यामुळे मेकअप टिकून राहतो.

पावसाळ्यात लिक्विड फाऊंडेशन ऐवजी पावडर फाऊंडेशनचा वापर करा. यामुळे चेहरा कोरडा राहतो आणि मेकअप पसरण्याचे चान्सेस कमी असतात.

पावसाळ्यात मेकअप खुलवण्यासाठी मॅट लिपस्टिकचा वापर करा. कारण ती बराच काळ टिकू शकते आणि इतरत्र पसरत नाही.

पावसाळ्यात काजळ आणि आयलायनर लावणे त्रासदायक ठरु शकते. तसेच पावसामुळे ते भिजू शकते. त्यामुळे तुम्ही वॉटरप्रूफ आयलायनर वापरु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.