Monika Lonkar –Kumbhar
सध्या देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. पाळीव प्राण्यांना देखील पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी सर्वात आधी त्यांची राहण्याची व्यवस्थित सोय करा.
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे प्राण्यांच्या पंज्यांवर संसर्ग, संक्रमण होऊ शकते. त्यामुळे, त्यांच्या पायांची नखे, पंजे आणि केस नियमितपणे स्वच्छ करा.
पावसाळ्यात पाळीव प्राणी फारसे सक्रिय नसतात. त्यांना बाहेर पडून हालचाल ही करता येत नाही. त्यामुळे, त्यांचा आहार हलका आणि संतुलित ठेवा.
पावसाळ्यात संतुलित आहारासोबतच त्यांना प्यायला शुद्ध पाणी द्या.
ऋतु कोणताही असो, तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यांची पशुवैद्यकाकडून नियमितपणे तपासणी करणे, गरजेचे आहे.