सकाळ डिजिटल टीम
Skin Care Tips : आजकाल प्रत्येकालाच सुंदर आणि आकर्षक दिसण्याची इच्छा असते. यासाठी लोक अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने वापरतात.
परंतु, काहीवेळा ही प्रसाधने फायदे देण्याऐवजी चेहऱ्याला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
बहुतेक लोक चेहऱ्याच्या काळजीकडं लक्ष देतात, परंतु क्वचितच त्यांच्या टाचांची काळजी घेतात. आपल्या भेगा पडलेल्या पायाच्या टाचांना मुलायम बनवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय आहे.
यासाठी लिंबाच्या साली वापरा. फक्त लिंबाची साल घ्या आणि भेगा पडलेल्या टाचांवर चोळा. हे एक आठवडा दररोज करा. त्यानंतर तुमची टाच मऊ, मुलायम झालेली असेल.
पावसाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. शॅम्पूने केसांना व्यवस्थित धुतले, तरी कोंडा राहतोच. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी एक सोपा उपाय आहे.
जेव्हा तुम्ही आंघोळ करत असाल, तेव्हा तुमच्या शॅम्पूमध्ये चिमूटभर मीठ घाला. केसांना नीट लावा आणि धुवा. या उपायाने कोंड्यापासून तुमची सुटका होईल.
हिवाळ्यात कोरड्या ओठांची समस्या सामान्य आहे, परंतु प्रत्येक ऋतूमध्ये अनेकांचे ओठ कोरडे होऊ लागतात. यासाठी दालचिनी हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे.
दालचिनी एक ते दोन तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ही दालचिनी पेस्ट ओठांवर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या. हा उपाय नियमितपणे केल्याने ओठ मुलायम होतात.
टीम : दिलेल्या माहितीचं अनुसरण करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.