पावसाळ्यात घरीच करा कुरकुरीत कॉर्न भजी...

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात लोकांना स्वीट कॉर्न खायला खूप आवडते.

स्वीट कॉर्न हे पचायला हलके असते तसेच त्यामध्ये प्रोटिन्स देखील जास्त प्रमाणात असतात. चला तर मग जाणून घेऊया कुरकुरीत मक्याची भजी कशी करतात.

मक्याची भजी साहित्य

२ कप मका, १ कांदा, कोथिंबीर, ३-४ हिरव्या मिरच्या, आलं, ३ पाकळ्या लसूण, १ चमचा चाट मसाला, १/४ हिंग, मीठ, २ मोठे चमचे तांदळाचे पीठ, १/२ कप बेसन.

सर्वप्रथम एका बाउलमध्ये मक्याचे दाणे काढून घ्या. त्यातील 2 ते 3 चमचे मक्याचे दाणे बाजूला काढून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

मग वाटलेला मका आणि बाऊलमध्ये काढलेले मक्याचे दाणे मिक्स करा.

मग त्यात हळद, मीठ, चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, लसणाच्या पाकळ्या, चाट मसाला, तांदूळ पीठ, बेसन पीठ आणि चिमूटभर हिंग इत्यादी साहित्य टाकून मिक्स करून घ्या.

हे मिश्रण पाणी न घालता व्यवस्थित एकजीव करून घ्या.

मग कढईत तेल गरम करून त्यात कॉर्न भजी टाका. अशा प्रकारे कुरकुरीत कॉर्न भजी तयार होते.