सकाळ डिजिटल टीम
Monsoon Travel : जर तुम्हीही पावसाळ्यात कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे पावसाळ्यात जाणे टाळावे.
जर तुम्ही उत्तराखंड, नैनिताल आणि भीमताल सारख्या ठिकाणांना पावसाळ्यात भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही या मोसमात या ठिकाणांना भेट देणे टाळावे. कारण, इथं सतत पाऊस पडतो आणि भूस्खलनही होतं.
पावसाळ्यात संपूर्ण मुंबई पावसाने तुंबून जाते. अशा परिस्थितीत पावसाळ्याच्या दिवसात चुकूनही मुंबईला जाऊ नये. तुम्हीही पावसाळ्यात मुंबईला जाण्याचा विचार करत असाल, तर चुकूनही इथे जाऊ नका.
हिमाचल प्रदेशात पावसाळ्यात भरपूर लोक प्रवास करतात. हे राज्य नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. परंतु, मुसळधार पावसामुळे येथील अनेक रस्ते बंद होतात. अशा परिस्थितीत तुम्ही हिमाचल प्रदेशात दीर्घकाळ अडकून राहू शकता.
सिक्कीम हे नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. पावसाळा सोडून इतर महिन्यांत सिक्कीमला नक्की भेट द्या, कारण पावसाळ्यात इथले हवामान खराब होते. पावसाळ्यात रस्त्यावरून वाहने चालवणे अवघड होऊन बसते.
केरळ पावसाळ्यात खूप हिरवे आणि सुंदर दिसते. येथील विलोभनीय नजारे पाहण्यासाठी लोक लांबून येतात. पावसाळ्यात इथले दृश्य फारच भितीदायक होते. म्हणूनच, जर तुम्ही केरळला भेट देण्याचा विचार करत असाल तर ते फक्त सप्टेंबर ते मार्च दरम्यान करा