Monika Lonkar –Kumbhar
देशातील अनेक भागांमध्ये पावसाने सध्या दमदार हजेरी लावली आहे.
महाराष्ट्रात ही पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही मनसोक्त फिरू शकता. कोणती आहेत ती ठिकाणे? चला जाणून घेऊयात.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात हा धबधबा स्थित आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला हा धबधबा ‘उलटा धबधबा’ म्हणून ही प्रसिद्ध आहे.
लोणावळा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. लोणावळा घाटातील विविध पॉईंट्स आणि समृद्ध निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात.
पुण्यापासून ४० किमीच्या अंतरावर असणारा हा ताम्हिणी घाट निसर्गाने समृद्ध आहे. पावसाळ्यात या घाटात अनेक छोटे-मोठे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.
ताम्हिणी घाटात स्थित असलेला हा अंधारबन ट्रेक पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. जर तुम्हाला पावसात भिजण्यासोबतच मस्त ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर हा ट्रेक सर्वोत्तम आहे.