Sudesh
आपल्या पृथ्वीचा एकुलता एक नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र.
आपला चंद्र हा आता हळू-हळू म्हातारा होत चालला आहे.
यामुळे चंद्राचा आकार मोठ्या प्रमाणात कमी होत चाललाय, तसंच त्याचं तापमानही वेगाने कमी होतंय.
काही लाख वर्षांमध्ये चंद्राचा आकार हा सुमारे 45 मीटरपेक्षा अधिक लहान होऊ शकतो.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सातत्याने होत असलेल्या भूकंपांमुळे असं होत आहे.
यामुळेच याठिकाणी कोणतंही बांधकाम करणं अवघड होत आहे. मात्र, वैज्ञानिक इथेच मून स्पेस स्टेशन बनवण्याचा विचार करत आहेत.
जर चंद्राची भौगोलिक स्थिती नीट राहिली नाही, तर याठिकाणी अंतराळवीरांना उतरणं देखील कठीण जाणार आहे.
पृथ्वीच्या वातावरणावर चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव पडत असतो. चंद्राचा आकार बदलल्यास यामध्येही बदल होऊ शकतो. यामुळे इथलं वातावरण बदलू शकतं.