साक्षी राऊत
पाणी पुरी भारतातील सर्वाधिक आवडते स्ट्रीट फूड आहे. त्यात असलेले चटपटीत मसाले आणि चण्याची फिलींग लोक आवडीने चाखतात.
भारतातील मध्येप्रदेशमध्ये पाणी पुरीला फुल्की, ओडिशामध्ये गुपचुप, बंगालमध्ये पुचका तर उत्तरप्रदेशमध्ये यास गोल गप्पा अशी नावे आहेत.
इंडियन चाट फूडमध्ये या पदार्थाचे महत्व सर्वाधिक आहे. हा पदार्थ भारतात प्रत्येक घरात माहिती आहे.
पाणी पूरी केवळ मैद्याचीच नाही तर दाळीची सुद्धा बनवता येते. मूग डाळीची पाणीपुरी खायला फार टेस्टी असते.
२५० ग्राम मूग डाळीचे पीठ, १ कप रवा किंवा मैदा, १ चमचा बेकिंग सोडा, १ चमचा तूप आणि १ चमचा तेल
सगळ्यात आधी बाउलमध्ये मूग डाळीचे पीठ आणि रवा चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. आता त्यात बेकिंग सोडा, तूप आणि एक चमचा तेल घाला. आता पाणी टाकत कणीक मळून घ्या.
आता ही कणीक अर्धा तास कापड झाकून ठेवा. आता तेलाच्या हाताने लहान लहान गोळे बनवून घ्या. आता त्याच्या पुऱ्या लाटा.
आता एका कढईत तेल घालून ते गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात पुऱ्या तळून घ्या.
पाणीपुरीचे पाणी तयार करून घ्या. बट्याट्याच्या चटणीसह सर्व्ह करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.