Morne Morkel: डिविलियर्सचा शेजारी राहिलेल्या टीम इंडियाच्या बॉलिंग कोचबद्दल या गोष्टी माहित आहे का?

Pranali Kodre

वाढदिवस

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलचा जन्म ६ ऑक्टोबर १९८४ साली ट्रान्सवल येथे झाला.

Morne Morkel | Sakal

कुटुंबातही क्रिकेटचा वारसा

त्याच्या घरी क्रिकेटचं वातावरण होतं. त्याचे वडील आणि भाऊही क्रिकेट खेळले. त्याच्याबरोबरच त्याचा मोठा भाऊ एल्बी मॉर्केल हा देखील अनेकवर्षे दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळला.

Morne Morkel | Sakal

शेजारी

लहानपणी तर मॉर्केल कुटुंब हे एबी डिविलियर्सचे शेजारी होते. त्यामुळे एल्बी, मॉर्केल आणि एबी डिविलियर्स हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. ते नंतर दक्षिण आफ्रिकेकडूनही एकत्र खेळले.

Morne Morkel - AB De Villiers | Instagram

वनडे पदार्पण

मॉर्केलने २००७ साली आफ्रिका XI संघाकडून वनडे पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने भाऊ एल्बीसह सलामीला गोलंदाजी केली होती. त्यामुळे वनडेत पहिली दोन षटके टाकणारे ते पहिलेच भाऊ होते.

Morne Morkel | Sakal

पर्पल कॅप

मॉर्केलने २०१२ आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून (आत्ताचे दिल्ली कॅपिटल्स) खेळताना पर्पल कॅपही जिंकली होती. त्याने १६ सामन्यांत २५ विकेट्स घेतल्या होत्या.

Morne Morkel | Sakal

भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक

मॉर्केलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो प्रशिक्षण क्षेत्रात आला. तो सध्या भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

Morne Morkel | Sakal

कसोटी कारकिर्द

मॉर्केलने ८६ कसोटी सामने खेळताना ३०९ विकेट्स घेतल्या, तसेच ९४४ धावा केल्या.

Morne Morkel | Sakal

वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्द

त्याने ११७ वनडेमध्ये १८८ विकेट्स घेतले, तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४४ सामन्यांमध्ये ४७ विकेट्स घेतल्या आहेत.

Morne Morkel | Sakal

आयपीएल कारकिर्द

मॉर्केलने आयपीएलमध्ये ७० सामने खेळले असून ७७ विकेट्स घेतल्या आहेत.

Morne Morkel | Sakal

T20 World Cup मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने भारतीय महिलांच्या नावावर दोन नकोसे विक्रम

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024 | Sakal
येथे क्लिक करा