आशुतोष मसगौंडे
इस्रायलने भयंकर हल्ले करून लेबनॉनची कट्टरवादी संघटना हिजबुल्लाची अवस्था बिकट केली आहे. यामध्ये इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांची भूमिका मोठी आहे.
इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादच्या कारवायांबरोबरच या मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या महिला एजंट्सची जगभरात चर्चा आहे. मोसादमध्ये मोठ्या प्रमाणात महिला एजंट काम करतात.
मोसादमध्ये 40 टक्के महिला एजंट काम करतात. यातील २४ टक्के महिला उच्च पदांवर कार्यरत आहेत. अनेक गुप्त कारवायांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मोसादच्या महिला एजंटना त्यांच्या मोहिमेदरम्यान कोणाशीही शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी नाही.
मोसादच्या बहुतेक महिला एजंट लग्न करत नाहीत. गुप्तहेरांची जीवनशैली महिलांसाठी खूप आव्हानात्मक असते. यामुळे महिला एजंट अविवाहित राहणे पसंत करतात.
'सिल्विया राफेल: द लाइफ अँड डेथ ऑफ अ मोसाद स्पाय' नावाचे हे पुस्तक काफिर आणि राम ओरन यांनी लिहिले आहे. त्यात महिला एजंटचे आयुष्य, ओळख आणि मृत्यू याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे.
मोसादबद्दल लोकांमध्ये एक गैरसमज आहे की तिच्या महिला एजंट मिशनमध्ये यश मिळविण्यासाठी फ्लर्टिंगवर अवलंबून असतात.
मोसादच्या काही महिला एजंट्सनी धक्कादायक खुलासे करत सांगितले आहे की, त्यांचे आयुष्य एखाद्या गुप्तचर चित्रपटासारखे आहे, परंतु ग्लॅमरशिवाय.