Amit Ujagare (अमित उजागरे)
मद्य सेवन करणं हे शरिरासाठी खूपच हानिकारक आहे.
पण तरीही जगभरात लोक मद्यपान करतातच.
मद्यपान करणाऱ्यांना व्हिस्की, रम, स्कॉच, व्होडका असे अनेक पर्याय आहेत.
पण उन्हाळ्यात लोक बियर पिणं पसंद करतात.
बियरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असल्यानं लोक बियरला जास्त पसंती देतात.
भारतात आपल्याला शंभर रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत बियर बाजारात मिळतात.
पण जगातील सर्वात महागडी बियर ऐकून तुम्ही थक्क व्हालं.
ही अशी बियर आहे ज्याच्या किंमतीत तुम्ही एखादी लक्झरी कार खरेदी करु शकता.
'ऑलसोप्स आर्टिक एले' ही बियर जगतील सर्वाधिक महागडी बियर आहे.
ही बियर तुम्हाला कुठल्याही बियर शॉपीमध्ये मिळणार नाही, कारण ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही.
रिपोर्सट्सच्या माहितीनुसार, 'ऑलसोप्स आर्टिक एले' या बियरच्या एका बाटलीची किंमत ५ लाख डॉलर आहे.
म्हणजेच या बियरची भारतीय रुपयांमधील किंमत ४ कोटी रुपयांहून अधिक आहे.
ही बियर इतकी महाग यासाठी आहे की ती १४० वर्षांहून अधिक जुनी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.