Pranali Kodre
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने ८ नोव्हेंबर रोजी पहिला टी२० सामना ६१ धावांनी जिंकला.
भारताच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने शतक करत मोलाचा वाटा उचलला.
संजू सॅमसनने या सामन्यात ५० चेंडूत ७ चौकार १० षटकारांसह १०७ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
संजू सॅमसनने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याने ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्ध हैदराबादमध्ये झालेल्या टी२० सामन्यात १११ धावांची शतकी खेळी केली होती, तेव्हाही सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये दोन वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांवर एक नजर टाकू.
दिनेश कार्तिकने १९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून खेळताना असून एकवेळा सामनावीर पुरस्कार जिकंला आहे.
केएल राहुलने ८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून खेळताना एकदा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
इशान किशनने १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून खेळताना एकवेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
ऋषभ पंतने ६४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून खेळताना एकदा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.