Chinmay Jagtap
रा
मुंबईच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील ४७ प्राणी आणि पक्ष्यांचा गेल्या वर्षभरात मृत्यू झाला आहे.
राणीबागेत वर्षभरात ४७ पैकी २९ प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे.sa
हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू होत असल्याची माहिती केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने त्यांच्या वार्षिक अहवालात दिली आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने देशभरातील प्राणिसंग्रहालयातील पक्षी आणि प्राणी यांच्याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.
राणीबागेतील ज्या पशू आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये पोपट आफ्रिकन ग्रे, कॉकॅटियल बडेरिगर, सांबर हरण, बडेरिगर, मॅकॉ मिलिटरी, तीतर गोल्डन, भारतीय फ्लॅपशेल, कासव, गोल्डन जॅकल, इमू इत्यादी पक्षी आणि प्राण्यांचा समावेश आहे.
प्राधिकरणाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या २०२२-२०२३ च्या वार्षिक अहवालात काही ठळक बाबींचा समावेश केला आहे.
धोक्यात असलेल्या प्रजातींसह इतर प्राणी हृदयाचा झटका, श्वसनक्रिया बंद होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या आजारांना बळी पडत आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.