सकाळ डिजिटल टीम
भारतातील प्रत्येक राज्याला वेगवेगळी खाद्यसंस्कृती आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला देखील विशिष्ट खाद्यसंस्कृती आहे. मग जाणून घेऊयात महाराष्ट्रात सर्वाधिक खाल्ले जाणारे पदार्थ कोणते ?
वडापाव हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ असून महाराष्ट्रातील गल्लोगल्ली हा पदार्थ मिळतो.
कांदा-भजी हा पदार्थ महाराष्ट्रात जास्त प्रमाणात खाल्ला जातो.
पुरणपोळी हा गोड पदार्थ आहे. सणासुदीला महाराष्ट्रातील घरांमध्ये हा पदार्थ बनवला जातो.
मोदक हा पदार्थ गणपती-बाप्पाचा नैव्यद्य म्हणून महाराष्ट्रातभरात प्रसिद्ध आहे.
जसे इतर राज्यांमध्ये जेवणामध्ये 'रोटी' खाल्ली जाते. त्याप्रमाणे महाराष्ट्रीयन जेवणामध्ये भाकरीचा समावेश असतो.
वरण भात महाराष्ट्रीयन जेवणातील प्रमुख पदार्थ आहे.
महाराष्ट्रात प्रामुख्याने उपवासाला साबुदाणा खिचडी हा पदार्थ खाल्ला जातो.