सकाळ डिजिटल टीम
इंडियन प्रीमिअर लीग (IPL) ही जगातील सर्वाधिक आर्थिक फायद्याची स्पोर्ट्स लीग आहे. आर्थिक फायद्यामध्ये एनएफएल( NFL)नंतर आयपीएलचा दुसरा नंबर लागतो.
रिलायन्स इंडस्ट्रीस ( मुकेश अंबानी) यांच्या मालकिचा मुंबई इंडियन्स आयपीएल मधील सर्वात श्रीमंत संघ आहे. संघाची एकूण नेट वर्थ ८७ मिलीयन डॉलर म्हणजेच ६५२.५ कोटी रूपये इतकी आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक इंडिया सिमेंट(एन. श्रिनीवासन) हे आहेत. तर सीएसके संघाची एकूण नेट वर्थ ८० मिलीयन डॉलर म्हणजेच ६०७.५ कोटी रूपये इतकी आहे.
अभिनेता शाहरूख खान, जुही चावला व जय मेहता यांच्या कोलकाता नाइट रायडर्स संघाची एकूण नेट वर्थ ७८ मिलीयन डॉलर म्हणजेच ५८९.५ कोटी रूपये इतकी आहे.
युनायटेड स्पिरीट यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB)संघाची एकूण नेट वर्थ ६९.८ मिलीयन डॉलर म्हणजेच ५२३.५ कोटी रूपये इतकी आहे.
गुजरात टायटन्स संघाची मालकी सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स यांच्याकडे आहे व संघाची एकूण नेट वर्थ ६५.४ मिलीयन डॉलर म्हणजेच ५४६.१ कोटी रूपये इतकी आहे.
जेएमआर(JMR)समूह आणि जेएसडबल्यू(JSW)समूह यांच्या मालकिच्या दिल्ली कॅपीटल्स संघाची एकूण नेट वर्थ ५३५.३ मिलीयन डॉलर म्हणजेच ४८०.४ कोटी रूपये इतकी आहे.
राजस्थान रॉयल्स संघाची मालकी द रॉयल्स स्पोर्ट्स समूह यांच्याकडे आहे व संघाची एकूण नेट वर्थ ६२.५ मिलीयन डॉलर म्हणजेच ५२१.९ कोटी रूपये इतकी आहे.
सन समूह यांच्या सनरायझर्स हैदराबाद संघाची एकूण नेट वर्थ ४८.२ मिलीयन डॉलर म्हणजेच ४०२.५ कोटी रूपये इतकी आहे.
आरपीएसजी समूह यांच्या मालकिच्या लखनौ सुपर जायंट्स संघाची एकूण नेट वर्थ ४७ मिलीयन डॉलर म्हणजेच ३९२.५ कोटी रूपये इतकी आहे.
पंजाब किंग्स संघाची मालकी मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्याकडे आहे व संघाची एकूण नेट वर्थ ४५.३० मिलीयन डॉलर म्हणजेच ३७८.३ कोटी रूपये इतकी आहे.