सकाळ डिजिटल टीम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०२४ या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी जाणून घेऊयात.
श्रीलंकेच्या कुशल मेंडिसने २०२४ वर्षात ४८ डावांवमध्ये १६२० धावा केल्या आहेत व तो या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे.
जैस्वालने २०२४ मध्ये २९ डावांमध्ये १४१२ धावा केल्या आहेत आणि यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.
श्रीलंकन फलंदाज पथुम निसंकाने ३५ डावांमध्ये १४०८ धावा केल्या आहेत व यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
३१ डावांमध्ये १३४५ धावा करणारा कमिंडू मेंडिस यादीत चौथ्या स्थानी आहे.
इंग्लंडच्या जो रूटने २५ डावांमध्ये १३३८ धावा केल्या आहेत व यादीत तो पाचव्या स्थानी आहे.
बेन डकेटने ३१ डावांत १२७४ धावा करून यादीत सहावे स्थान मिळवले आहे.
२६ डावांत १२२५ धावा करणारा हॅरी ब्रुक यादीत सातव्या स्थानी आहे.
३० डावांमध्ये ११२९ धावा करणारा शुभमन गिल यादीत आठव्या स्थानी आहे
भारतीय कर्णधार रोहित शर्माने २०२४ मध्ये ३५ डावांत ११२३ धावा करून यादीत नववे स्थान गाठले आहे.
पाकिस्तानचा वन-डे कर्णधार मोहम्मद रिझवान ३० डावांमधील १०९९ धावांसह यादीत दहाव्या स्थानावर आहे.
अफगाणिस्तानी फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजने ३१ डावांत १०२९ धावा केल्या आहेत आणि यादीत त्याने ११ वे स्थान मिळवले आहे.