Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध २६ ऑक्टोबर रोजी कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने मायदेशातील १५ कसोटी सामन्यांपैकी पराभूत झालेला हा एकूण चौथा कसोटी सामना ठरला.
त्यामुळे आता मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने पराभूत होणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत रोहित संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आले आहे.
त्याच्यासह दुसऱ्या क्रमांकावर कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीनही आहे. त्यांनीही कर्णधार म्हणून मायदेशात प्रत्येकी ४ कसोटी सामने पराभूत झाले आहेत.
कपिल देव आणि अझरुद्दीन यांनी मायदेशात प्रत्येकी २० सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. त्यातील ४ सामने ते पराभूत झाले.
मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने पराभूत होणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत अव्वल क्रमांकावर मन्सुर अली खान पतौडी (टायगर पतौडी) आहेत.
टायगर पतौडी यांनी मायदेशात २७ कसोटी सामन्यांपैकी ९ सामन्यात पराभव स्विकारला होता.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूर येथे, २०२४ मध्येच इंग्लंजविरुद्ध हैदराबाद येथे, तर पुणे कसोटीपूर्वी बंगळुरूला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटीत पराभव स्वीकारला आहे.