Pranali Kodre
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिका २२ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या सामन्यात विराट कोहलीला पहिल्या डावात जोश हेजलवूडने ५ धावांवर बाद केले. त्याचा झेल उस्मान ख्वाजाने घेतला.
त्यामुळे जोश हेजलवूड विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० व्यांदा बाद केले आहे.
हेजलवूडने विराटला १० किंवा त्यापेक्षा अधिकवेळा बाद करणाऱ्या टीम साऊदी (११ वेळा), जेम्स अँडरसन आणि मोईन अली (१० वेळा) यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
हेजलवूड विराटला सर्वाधिकवेळा बाद करणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाजही ठरला आहे.
हेजलवूड पाठोपाठ ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि ऍडम झाम्पा यांनी विराटला प्रत्येकी ८ वेळा बाद केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याने विराटला ७ वेळा बाद केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला विराट याला ५ वेळा बाद करण्यात यश मिळालं आहे.