अंकिता खाणे (Ankita Khane)
गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब या सर्व वेबसाईट अगदी लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वजण वापरतात.
मात्र, सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी वेबसाईट कोणती आहे तुम्हाला माहिती आहे का?
तुम्ही तुमच्या स्क्रीन टाईमवर नजर टाकली तर तुम्हाला कळेल की तुम्ही सर्वांत जास्त वेळ कोणत्या वेबसाईटवर घालवता.
या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यावर आधारित अहवालानुसार व्हॉट्सॲप दहाव्या स्थानावर आहे.
लोक व्हॉट्सॲपवर बराच वेळ घालवत असले तरी व्हॉट्सॲप रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये वेबसाइट शोधण्याचा आणि भेट देण्याचा डेटा वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स ट्विटर हँडलवर शेअर केला गेला आहे.
नोकऱ्या आणि इतर गोष्टींसाठी बनवण्यात आलेल्या लिंक्डइनला 19वे स्थान मिळाले आहे.
जगभरात सक्रिय असलेल्या आणि भारतात बंदी असलेले TikTok 14व्या क्रमांकावर आले आहे.
ई-कॉमर्स अंतर्गत, प्रत्येक घरापर्यंत वस्तू पोहोचवणाऱ्या Amazon कंपनीच्या वेबसाइटला 12 वे स्थान मिळाले आहे.
याहूला आठवे, विकिपीडियाला सातवे, ट्विटरला पाचवे स्थान मिळाले आहे.
चौथ्या क्रमांकावर रील बनवणारे ॲप इन्स्टाग्राम आहे.
फेसबुकने तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान कायम राखले आहे.
तर यूट्यूब दुस-या स्थानावर आहे आणि सर्वात जास्त भेट दिलेली वेबसाईट गुगल आहे.