केकेआरची सर्वाधिक डोकेदुखी कुणी वाढवली?

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता नाईट रायडर्स यांदाच्या हंगामात गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

मात्र आयपीएलच्या इतिहासात केकेआरला दमवणाऱ्या गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारचे नाव अव्वल स्थानावर आहे. त्याने केकेआरविरूद्ध 32 विकेट्स घेतल्या आहेत.

या यादीत राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 29 विकेट्स घेतल्या आहेत.

यादीत तिसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा नंबर लागतो. त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत.

चौथ्या स्थानावर पुन्हा राजस्थान रॉयल्सचा रविचंद्रन अश्विन असून त्याने केकेआरविरूद्ध 24 विकेट्स घेतल्या.

यादीत पाचव्या स्थानावर सीएसकेचा रविंद्र जडेजा असून त्याने केकेआरच्या आतापर्यंत 22 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल 2024 मध्ये शेवटच्या 5 षटकात कोणाचं स्ट्राईक रेट आहे सर्वोत्तम?

येथे क्लिक करा