Pranali Kodre
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 24 मार्च रोजी 6 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
पण या सामन्यात मुंबई इंजियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत सर्वांची वाहवा मिळवली.
त्याने या सामन्यात 4 षटकात 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे तो मुंबई इंडियन्ससाठी टी20 क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेणाा दुसराच गोलंदाज ठरला आहे.
बुमराहने 124 टी20 सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी 151 विकेट्स घेतल्या आहेत. तो मुंबई इंडियन्ससाठी मलिंगानंतर सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.
मलिंगाने मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 139 टी20 सामन्यात 195 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंग आहे. त्याने 158 टी20 सामन्यात 147 विकेट्स घेतल्या आहेत.
या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड असून त्याने 211 टी20 सामन्यांत 79 विकेट्स घेतल्या आहेत.
पाचव्या क्रमांकावर मिचेल मॅक्लेनघन आहे. त्याने 56 टी20 सामन्यांत 71 विकेट्स घेतल्या आहेत.