सकाळ डिजिटल टीम
मुंबई संघाने रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाला 169 धावांनी पराभूत करत 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. हा रणजी स्पर्धेचा ८९ वा हंगाम होता.
या रणजी ट्रॉफीच्या ८९ व्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ७ गोलंदाजांवर नजर टाकू.
तमिळनाडूच्या आर साई किशोरने ८९ व्या हंगामात ९ सामन्यात सर्वाधिक ५३ विकेट्स घेतल्या.
पदुच्चेरीच्या गौरव यादवने ७ सामन्यांमध्ये ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
तमिळनाडूच्या एस रजिथ रामनेही ८ सामन्यांत ४१ विकेट्सच घेतल्या आहेत.
सौराष्ट्रच्या धरमेंद्रसिंग जडेजाने देखील ८ सामन्यांत ४१ विकेट्सच घेतल्या आहेत.
मध्यप्रदेशच्या कुमार कार्तिकेयच्या नावावरही या हंगामात ९ सामन्यांत ४१ विकेट्सच आहेत.
महाराष्ट्राचा असलेल्या हितेश वाळुंजने देखील ७ सामन्यांमध्ये ४१ विकेट्सच घेतल्या आहेत.
बडोद्याच्या भार्गव भटने देखील या हंगामात ८ सामन्यांमध्ये ४१ विकेट्सच घेतल्या आहेत.