सासरी गेल्यानंतर सासूचे मन जिंकण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स वापरा..

सकाळ डिजिटल टीम

नव्याने लग्न होऊन आलेल्या एखाद्या वधूसाठी सासूचे मन जिंकणे कठिण असते. मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या या दोघींना जवळ आणू शकतात.

सुरुवातीपासून सासूसोबत तुम्ही उत्तम संवाद ठेवा. ज्यामुळे तुम्ही सासुला समजून घेत आहात असे दिसेल. आणि कदाचित सासूला तुमचा हा अंदाज पंसद येईल.

तुमची सासू जर तुम्हाला काही सल्ला देत असेल तर किंवा कोणत्याही कामाच्या बाबतीत काही बदल सांगत असेल तर त्यावर लगेच रिअॅक्ट होऊ नका. त्यांचे बोलणे ऐकून घ्या.

काही दिवस त्यांच्या पद्धतीने काम करा आणि नंतर तुमच्या पद्धतीने काम करा. यामुळे त्यांना त्यांचे मन राखले याचे समाधान होईल. यामुळे त्यांना पद्धत न वापरल्याचा रागही येणार नाही.

केवळ नवराच नाही तर सासूसोबतही वेळ घालवा. सासूबाईंसोबत बाहेर फिरायला जा. ज्यामुळे तुम्हाला एकमेकींना समजून घ्यायला मदत होईल.

सासूबाईंना काही गिफ्ट देवून तुम्ही सरप्राईज देऊ शकता. यासाठी आधी कधीतरी बोलता बोलता त्यांना त्यांची पसंद विचारुन घ्या आणि मग सरप्राईनज द्या.

सासूला खाण्यामध्ये काय आवडतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या आवडीचे काही पदार्थ त्यांना करुन खाऊ घाला. यामुळे त्या खुश होतील.

तुमचा नवरा हा त्यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या काही जुन्या आठवणी असतील तर त्यावर चर्चा करा. त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा बॉंड स्ट्रॉंग होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.