प्रणाली मोरे
राखी गुलजार यांना सलमान,शाहरुखपासून अनेक कलाकरांची आई बनलेलं आपण पाहिलं असेल. 'बाजीगर', 'करण अर्जुन','सोल्जर', 'बादशहा' हे त्यांचे आईची भूमिका केलेले मोठे सिनेमे ..
ललिता पवार यांना नेहमीच सावत्र आईच्या वाईट भूमिकेसाठी ओळखलं जायचं. त्यांनी या भूमिका गाजवल्या आहेत.
फरिदा जलाल म्हटलं की समोर उभी राहते प्रेमळ आई..जी केवळ आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता.
डिंपल कपाडिया बॉलीवूडच्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहेत. त्यांनी 'प्यार में ट्वीस्ट' या सिनेमात आईची भूमिका साकारली आहे.
रत्ना पाठक यांनी मॉर्डन आई उत्तम साकारली आहे.
'कभी खुशी कभी गम' मध्ये जया बच्चन यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकेला कोण विसरेल बरं..
किरण खेर म्हणजे बॉलीवूडच्या ग्लॅमरस आणि फॅशनेबल आईपैकी एक.
'हम दिल दे चुके सनम' मध्ये ऐश्वर्या रायची आई साकारल्यानंतर स्मिता जयकर यांना सुंदर अभिनेत्रींची आई म्हणून ओळखलं जायचं.
राजश्री प्रॉडक्शनची प्रसिद्ध आई म्हणजे रिमा लागू..सलमान खानच्या आईच्या भूमिकेत त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
बॉलीवूडच्या प्रसिद्ध आयांपैकी एक म्हणजे अचला सचदेव..'कभी खुशी कभी गम' मध्ये त्यांनी शाहरुख-हृतिकच्या आजीची देखील भूमिका साकारली होती.
७०-८० च्या दशकातील सुपरहिट आई म्हणजे निरुपा रॉय..
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.