Saisimran Ghashi
स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचे महत्त्व जागतिक पातळीवर पोहोचवले आणि तरुणांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिकवलेल्या जीवनमूल्यांमुळे जगभरातील लोकांवर आजही त्यांचा प्रभाव आहे.
आनंदी जीवन जगण्यास प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या महान विचारांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
"तुम्ही जे विचार करता, तुम्ही तेच बनता." स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय यश मिळवणे अशक्य आहे.
"उत्तम विचार करा, उत्तम बोला, उत्तम कार्य करा" असा संदेश विवेकानंद देतात.
"स्वतःसाठी ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी झगडा करा."
"जगात फक्त निर्भयच यशस्वी होतो."
"जीवनात कर्तव्यापासून दूर न जाता कार्य करा, कारण कर्म हेच अंतिम सत्य आहे."