Sudesh
मोटोरोला कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Moto G34 5G असं या स्मार्टफोनचं नाव आहे.
या स्मार्टफोनला तीन रंगांमध्ये लाँच केलं आहे. आईस ब्लू, चार्कोल ब्लॅक आणि ओशिअन ग्रीन असे तीन रंग असणार आहेत.
यामध्ये मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50MP प्रायमरी आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी 16MP क्षमतेचा कॅमेरा दिला आहे.
यामध्ये 6.5 इंच मोठा IPS LCD डिस्प्ले आहे. यात HD+ रिझॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे.
यामध्ये एड्रेनो 619 GPU, आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे.
या फोनचा बेस व्हेरियंटमध्ये 4GB+128GB स्टोरेज मिळते. तर टॉप मॉडेलमध्ये 8GB+128GB स्टोरेज मिळते.
या फोनच्या बेस व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर टॉप व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये आहे.
17 जानेवारीपासून याची विक्री सुरू होईल. फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या वेबसाईटवर हा फोन उपलब्ध असेल.
या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरमध्ये 1,000 रुपयांची सूट मिळत आहे. यामुळे बेस व्हेरियंट 9,999 रुपयांना खरेदी करताय येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.