Anuradha Vipat
कंगना रणौतच्या आजीचे निधन झाले आहे.
कंगनाने शनिवारी, 9 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर एका इन्स्टा स्टोरीद्वारे तिच्या चाहत्यांसह ही दुःखद बातमी शेअर केली आहे.
कंगनाने आपल्या आजीचे फोटो शेअर केले आणि एक भावनिक संदेश दिला आहे.
कंगनाने लिहिले, ‘काल रात्री माझी आजी इंद्राणी ठाकूर जी यांचे निधन झाले. कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कृपया प्रार्थना करा.
पुढे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, काही दिवसांपूर्वी माझी आजी आपल्या खोलीमध्ये साफसफाई करत असताना तीला ब्रेनस्ट्रोकचा अटॅक आला.
पुढे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ती या काळात ज्या स्थितीमधून जात होती, तो अनुभव तिच्यासाठी खूप वेदनादायी होता.
पुढे कंगनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ती कायमच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे.