सतत तोंड येतंय? ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

Aishwarya Musale

तोंड येणे ही खूपच सामान्य समस्या असली तरीही त्याने भयंकर असा त्रास होतो. व जेवणच काय तर साधं पाणी पिणंही कठीण होऊन बसतं. बोलतानाही भयंकर त्रास सहन करावा लागतो.

पण नेमकं  तोंड येतं कशाने हे समजून घेण गरजेचं आहे. विशेषत: गरमीच्या दिवसांत ही समस्या प्रामुख्याने जाणवते. पचनक्रियेत बिघाड होणे, याशिवाय जास्त मसालेदार, तळलेले पदार्थ खाणे यामुळे देखिल तोंड येण्याची समस्या उद्भवते. 

कोरफड 

कोरफड ही जवळपास सगळ्या जखमांवर काम करते. त्याचप्रमाणे तोंड आल्यावरही तिचा पुरेपूर उपयोग होतो. कोरफडीचा गर काढून तो तोंडातील फोडावर लावल्याने आराम मिळतो. 

बर्फ देईल आराम 

तोंड आल्यानंतर त्या फोडावर बर्फ फिरवल्याने आराम मिळू शकतो. तोंड येण्याचं मुख्य कारण हे शरीरातील उष्णता असते. त्यामुळे बर्फ शरीरात थंडावा निर्माण करून आराम पोहोचवतो.

इलायची

इलायची देखील या समस्येसाठी फारच उपयुक्त आहे. इलायचीच्या दाण्याची बारीक पूड करुन त्यात मध मिसळावं व ती पेस्ट जीभेवरील फोडांवर लावावी. त्याने तोंड येण्यापासून बचाव होतो. 

हळद 

तोंड आल्यावर हळद फारच उपयुक्त ठरते. हळद पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.

नारळ पाणी 

नारळ पाणी हे शरीरात थंडावा निर्माण करण्याचा उत्तम स्त्रोत आहे. त्याचबरोबर तोंड येणंही कमी करते.

कोथिंबीर 

कोथिंबीर पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यानंतर त्याने गुळण्या कराव्यात त्याने तोंडातील फोड कमी होतात व लवकर आराम मिळतो

जाणून घ्या रिकाम्या पोटी अक्रोड खाण्याचे फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of eating walnuts
येथे क्लिक करा