Anuradha Vipat
नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णींनी आपला ठसा उमटवला आहे.
काही वर्षांपूर्वी त्यांचा लेक विराजस कुलकर्णीने आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
आज लेकाच्या वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रिय विराजस, आज २९ फेब्रुवारी – तुझा वाढदिवस अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात…पण सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे “तू” आहेस…! जसे कष्ट तू करतो आहेस, त्यावरून हे नक्की, की येणारं वर्ष “तुझं” असणार आहे.. अशी खास पोस्ट करत मृणाल कुलकर्णीं यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत
तसेच स्वप्न बघणं कधीही सोडू नकोस असा सल्ला त्यांनी आपल्या लेकाला दिला आहे.
मृणाल कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.