Monika Lonkar –Kumbhar
मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे.
कंकू, अग्निहोत्र यांसारख्या गाजलेल्या मालिका आणि पुणे व्हाया बिहार, मोकळा श्वास, कट्यार काळजात घुसली, शेरशिवराज आणि मुंबई डायरी सारख्या सुपरहीट वेबसिरीजमध्ये तिने काम केले आहे.
मृण्मयी तिच्या वेस्टर्न आणि पारंपारिक लूक्ससाठी खास करून ओळखली जाते. तिचे हे दोन्ही लूक्स चाहत्यांना प्रचंड आवडतात.
नुकतीच मृण्मयीने अभिनेत्री पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणच्या लग्नाला हजेरी लावली होती.
पूजाच्या लग्नात मृण्मयी या पिवळ्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये दिसून आली. या साडीत ती खूपच गोड दिसतेय.
मृण्मयीच्या या सुंदर साडीतल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे.