Kiran Mahanavar
चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी लखनौमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या तुफानी खेळीने इतिहास रचला.
42 वर्षीय धोनीने 311.11 च्या स्ट्राइक रेटने 9 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या, ज्यात त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले.
या खेळीनंतर धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
धोनीने 257 सामन्यांच्या 223 डावांमध्ये 5169 धावा केल्या आहेत, तर डिव्हिलियर्सने 184 सामन्यांच्या 170 डावांमध्ये 5162 धावा केल्या आहेत.
वयाच्या 40 वर्षांनंतर आयपीएलमध्ये 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा धोनी पहिला खेळाडू ठरला आहे.
या यादीत त्याच्यानंतर ख्रिस गेलचा क्रमांक लागतो, ज्याने वयाच्या 40व्या वर्षी आयपीएलमध्ये 481 धावा केल्या आहेत.
धोनी या हंगामात आतापर्यंत 5 डावात फलंदाजीला आला आहे आणि त्याने एकूण 87 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 37 आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.