Pranali Kodre
आयपीएल 2024 स्पर्धेत 19 एप्रिल रोजी 34 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सला 8 विकेट्सने पराभूत केले.
पण असे असले तरी या सामन्यात चेन्नईकडून एमएस धोनीने केलेल्या तुफानी फटकेबाजीने अनेकांची मनं जिंकली.
या सामन्यात धोनीने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत 9 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 28 धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान त्याने 19 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोहसीन खानविरुद्ध स्कुप शॉट खेळत यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून षटकार ठोकला.
त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले की धोनीने यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून षटकार मारला.
दरम्यान, धोनीने 20 व्या षटकातही एक षटकार ठोकला. त्यामुळे हा त्याचा आयपीएलमध्ये 20 व्या षटकातील 65 वा षटकार ठोकला.
धोनी आयपीएलमध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार ठोकणाराही फलंदाज आहे.