Pranali Kodre
भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केल्यापासून ७ क्रमांकाचीच जर्सी घालत आहे.
७ क्रमांक हा धोनीची एकप्रकारे ओळखच झाली आहे. त्याला त्याच्या ७ क्रमांकाच्या जर्सीमुळेच ओळखले जाते.
त्याने एका मुलाखतीत विक्रम साठे यांच्याशी बोलताना त्याच्या जर्सी क्रमांकाबद्दल सांगितले होते.
धोनीला विक्रम यांनी ७ आकडा खास का असं विचारलं होतं, त्यावर धोनीने सांगितलं होतं की त्याचा जन्म ७ जुलै १९८१ रोजीचा आहे. त्यामुळे तारीख आणि महिना ७ येतो. त्याचबरोबर ८ वजा १ असं सालाचं गणित केलं तरी ७ येतं.
धोनीने पुढे सांगितले की माझ्याआधी जवागल श्रीनाथ ७ क्रमांकाची जर्सी घालायचे. पण ते निवृत्त झाले होते, त्यामुळे मी तो क्रमांक घेतला.
धोनीने असंही सांगितलं की त्याच्याकडे पर्यायी क्रमांकही रेडी होता.
तो म्हणाला, जेव्हा मी फुटबॉल खेळायचो, तेव्हा माझा जर्सी क्रमांक २२ होता. तो काही मी निवडलेला नव्हता, पण मला मिळालेला होता. त्यामुळे जर मला क्रिकेटमध्ये ७ क्रमांक नसता मिळाला, तर मी २२ क्रमांक घेतला असता.