धोनीचा तो ऐतिहासिक षटकार MCA ला कोट्यवधी रूपये कमवून देणार

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2011 च्या वर्ल्डकपमध्ये वानखेडेवर ऐतिहासिक षटकार मारला अन् 28 वर्षांनी भारताने वर्ल्डकप उंचावला.

धोनीचा हा षटकार भारतीय इतिहासातील एक सुवर्ण क्षण ठरला. ज्या ज्यावेळी भारताच्या 2011 वर्ल्डकप विजयाची चर्चा होते धोनीचा हा षटकार हमखास दाखवला जातो.

आता याच ऐतिहासिक षटकाराच्या जोरावर मुंबई क्रिकेट असोसिएशन कोट्यवधी रूपये कमवण्याच्या तयारीत आहे.

धोनीचा तो षटकार ज्या दोन सीटवर जाऊन पडला होता. त्या सीटचा आता लिलाव होणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2011 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये 49 व्या षटकात धोनीने दुसऱ्याच चेंडूवर षटकार मारला.

हा षटकार ज्या दोन सीटवर जाऊन पडला त्या सीटला 2011 वर्ल्डकप मेमोरियअल सीट्स असं म्हणतात. आता भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमधील सामन्यांसाठी या सीट्सचा लिलाव होणार आहे.

हा लिलाव जिंकणाऱ्याला हॉस्पिटॅलिटी पॅकेज दिलं जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सीट्सची किंमत कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.