राहुल शेळके
सध्या देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
शाहरुख खान, कार्तिक आर्यन, विकी कौशल, वरुण धवन, नील नितीन मुकेश आणि बोमन इराणी यांसारख्या सेलिब्रिटींनी लालबाग राजाचे दर्शन घेतले आहे.
या वर्षी लालबागचा राजा मयूर राजवाड्यात विराजमान झाला असून राजाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे ठिकठिकाणी दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या दानपेट्यांमध्ये भाविक स्वेच्छेने देणगी देतात. काही भाविक सोन्या-चांदीच्या भेटवस्तू देतात.
लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी 48.30 लाख रुपयांची देणगी मिळाली आहे.
दानपेटीत जमा झालेल्या देणगीची मोजणी रविवारपासून सुरू झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी आणि लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अधिकाऱ्यांनी देणगीच्या मोजणीत सहभाग घेतला.
देणगीची मोजणी केल्यानंतर समितीचे खजिनदार मंगेश दळवी म्हणाले की, एका दिवसात लालबागच्या राजाच्या चरणी 48 लाख 30 हजार रुपये अर्पण करण्यात आले.
255.8 ग्रॅम सोने आणि 5024 ग्रॅम चांदीही गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.