आशुतोष मसगौंडे
कोकणी लोकांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकीला टीकेचा सामना करावा लागत आहे.
स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकी रिॲलिटी टीव्ही शोमध्ये येण्यापूर्वीपासूनच इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय नाव आहे.
रिॲलिटी शोच्या परफॉर्मन्समुळे मुनव्वरला अधिक लोकप्रियता मिळाली आहे. त्याने दोन रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि दोन्ही शोचे विजेतेपद पटकावले आहे.
भारतातील तरुण कॉमेडियन मुनाव्वर फारुकीने 2023 पर्यंत सुमारे 8 कोटी रुपयांची संपत्ती जमवली आहे.
मुनव्वरच्या कमाईचा मुख्य स्रोत स्टँड-अप शोमधून येतो, तो प्रत्येक परफॉर्मन्ससाठी 3 ते 4 लाख रुपये आकारतो.
मुनव्वर प्रायोजित इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून 15 लाखांपेक्षा जास्त पैसे कमावतो.
YouTube मुनव्वरला मासिक 8 लाखांहून अधिक कमाई होते. बिग बॉस 17 सारख्या रिॲलिटी शोमध्ये फारुकीचा सहभाग आणि स्मार्ट गुंतवणूक पर्याय यामुळे त्याच्या वाढत्या संपत्तीत आणखी भर पडली आहे.
32 वर्षीय फारुकीला बिग बॉस 17 चा विजेता बनल्यानंतर एक कार आणि 50 लाखांचे रोख बक्षीस मिळाले होते. बिग बॉस 17 मध्ये सहभागी होण्यासाठी मुनव्वरने दर आठवड्याला 7 लाख ते 8 लाख रुपये कमावले.
बिग बॉसमधील 12 आठवड्यांच्या काळात, शोमधून त्याची एकूण कमाई 84 लाख ते 96 लाख रुपये होती. बक्षीस रकमेसह त्याची एकूण कमाई 1.34 कोटी ते 1.46 कोटी रुपये होती.