Anuradha Vipat
स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 विजेता मुनव्वर फारुकी याची प्रकृती खालावली आहे.
मुनव्वरला रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं आहे.
मुनव्वर याचा खास मित्र नितिन मेंघानी याने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
त्याने मुनव्वरवरचा हॉस्पिटलच्या बेडवर विश्रांती करतानाचा एक फोटो शेअर केला आहे यामध्ये मुनावर याच्या हातावर IV ड्रिप दिसत आहे.
फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
सध्या मुनव्वर याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर देखील मुनव्वर कायम चर्चेत असतो