महाराष्ट्रातील शेवटपर्यंत 'अजिंक्य'राहिलेला किल्ला, मराठ्यांना आलं होतं अपयश

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत, या स्वराज्यात अनेक किल्ले सामील केले.

Vijaydurg | Esakal

अनेक शासकांचे महाराष्ट्रातील तळ त्यांनी उधळून लावले. पेशव्यांच्या काळात मराठ्यांनी अटकेपर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता.

Daulatabad Fort | Esakal

मात्र, मुरुड-जंजिरा किल्ला मराठ्यांना जिंकण्यात अपयश आलं. मराठ्यांनी हा किल्ला जिंकण्याचे असंख्य प्रयत्न केले,पण या किल्ल्याला चहूबाजुंनी असलेल्या अभेद्य सुरक्षेमुळे हा किल्ला 'अंजिक्य' राहिला.

Murud Janjira | Esakal

मराठा सरदार कोंडाजी फर्जंद यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी या किल्ल्यात प्रवेश केला होता. मात्र, त्याच्या या योजनेचा सुगावा लागल्याने त्यांना तोफेच्या तोंडाशी देण्यात आलं.

Murud-Janjira | Esakal

जंजिरा किल्ला चारही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून समुद्राच्या मध्यभागी असलेला एकमेक किल्ला आहे.

Murud-Janjira | Esakal

जर कधी शत्रूचा हल्ला झाला तर, किल्ल्याच्या चारही बाजूला लांब पल्ल्याच्या तोफा तैनात करण्यात आल्या होत्या. समुद्रात असला तरीही किल्ल्यावर गोड्या पाण्याचे तलावही होते.

Murud-Janjira | Esakal

छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी त्याच्या शेजारी पद्मदुर्ग बांधायला सुरुवात केली होती. मात्र, किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होऊ शकलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murud-Janjira | Esakal