'या' लोकांनी चुकूनही मशरूमचे सेवन करू नये, अन्यथा आरोग्यावर होतो वाईट परिणाम

सकाळ डिजिटल टीम

अनेकांचा आवडता खाद्यपदार्थ

जगभरातील अनेक लोकांच्या आवडत्या खाद्यपदार्थांच्या यादीत मशरूमचाही समावेश आहे. लोक ते मोठ्या उत्साहाने खातात.

Mushroom Side Effects

मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर, पण..

मशरूम खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आढळतात.

Mushroom Side Effects

अॅलर्जी

काही लोकांना मशरूमच्या सेवनाने अॅलर्जी होऊ शकते, त्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे, श्वास घेण्यास अडचण यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते

Mushroom Side Effects

मूत्रपिंड समस्या

मशरूमच्या सेवनाने यूरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. किडनी स्टोन लोकांसाठी हे हानिकारक असू शकते.

Mushroom Side Effects

अन्नातून विषबाधा

अनेक प्रकारचे मशरूम जंगली (जंगलात मिळणारे) देखील असतात. अशा मशरूमच्या सेवनाने अन्नातून विषबाधा होऊ शकते.

Mushroom Side Effects

आतड्यांसंबंधी समस्या

ज्या लोकांना आतड्यांसंबंधी समस्या आहेत, त्यांनी मशरूम खाणे टाळावे. कारण, यामुळे आतड्यांतील वायू आणि सूज वाढू शकते.

Mushroom Side Effects

यकृत समस्या

काही मशरूममध्ये विषारी पदार्थ असू शकतात, त्यामुळे यकृत खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत यकृताच्या समस्या असलेल्यांनी मशरूमचे सेवन टाळावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Mushroom Side Effects

'ही' 5 प्रकारची प्रथिने आरोग्यासाठी आहेत विष, फायद्याऐवजी होऊ शकतं नुकसान

Protein Benefits | esakal
येथे क्लिक करा