Amit Ujagare (अमित उजागरे)
पावसाळा आला की पर्यावरणात अनेक बदल होतात, या बदलांच्या आपल्या प्रकृतीवर परिणाम होतो.
अनेकजण पावसाळ्यात आजारी पडतात. त्यामुळं खानपान हे जपूनच करावं लागतं.
पावसाळ्यात तब्येत सांभाळण्यासाठी कोणते पदार्थ खाऊ नयेत, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रस्त्यावर विकले जाणारे पदार्थ आणि चाट पावसाळ्यात खाणं टाळा कारण ते योग्य स्वच्छता न राखता बनवलेले असू शकतात. त्यामुळं तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात.
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाऊ नयेत, कारण या भाज्यांच्या पानांवर माती आणि जंतू असण्याची शक्यता खूप असते.
पावसाळ्यात समुद्री माश्यांपैकी शेलफीस खाऊ नयेत. कारण पावसाळ्यात ते दुषित झालेले असतात त्यामुळं विषबाधा होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यात शक्यतो तळलेले आणि तेलकट पदार्थ खाऊ नका, कारण तळलेले पदार्थ पावसाळ्यात पचण्यासाठी जड असतात. त्यामुळं पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
कापून ठेवलेली फळं आणि रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेले कच्या काकड्या, गाजर वैगरे खाऊ नका कारण ते व्यवस्थित धुतलेली नसतात. यामुळं विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते.