सकाळ डिजिटल टीम
आग्रा हे भारतासह परदेशी पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. येथील सुंदर ताज महल पाहण्यासाठी मोठी गर्दी असते. दिवाळी सुटीत तुम्ही इथे फिरण्याचं नियोजन घालू शकता.
गोव्यातील पर्यटन प्रत्येकाला भूरळ घालत असते. येथील सुंदर समुद्रकिनारे, संगीत, नाइटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना वेगळा अनुभव देतात. दिवाळीत हे भेट देण्यासारखं ठिकाण आहे.
केरळचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं आहे. येथील बॅकवॉटर, एलेप्पी, मुन्नारची सौंदर्यस्थळे पर्यटकांना आनंद देतात.
वाराणसी ही सर्वात प्राचीन नगरींपैकी एक आहे. येथील गंगेच्या घाटांवर वसलेल्या प्राचीन संस्कृतीचं दर्शन पर्यटकांना आकर्षित करत असतं.
ऋषिकेश ही योगाची राजधानी मानली जाते. येथील साहसी क्रीडा, ध्यानधारणेची केंद्रे पर्यटकांना आकर्षित करत असतात. हे देखील दिवाळीत फिरण्यासारखं ठिकाणं आहे.
पार्वती व्हॅलीत वसलेलं कसोल हे नैसर्गिक सौंदर्य आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. इथे देखील तुम्ही दिवाळीची सुटी एन्जाॅय करु शकता.
गुलाबी शहर जयपूर येथे आमेर किल्ला, सिटी पॅलेस, हवामहल यांसारखी ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना भूरळ घालत असतात.