सकाळ डिजिटल टीम
दिवाळीच्या लांब सुट्टीमध्ये जर तुम्ही आपल्या कुटुंबाबरोबर बाहेर फिरण्याचे ठरवत असाल, तर ही ठिकाणे तुमच्यासाठी उत्तम आहेत.
उत्तराखंडमधील मुक्तेश्वर हे ठिकाण निसर्गसौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे जाऊन तुम्ही स्वच्छ आणि थंड हवेचा आनंद घेऊ शकता. याशिवाय ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, बाइकिंग, राफ्टिंगची देखील या ठिकाणी सुविधा आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅली एक सर्वोत्तम पर्याय आहे. तीर्थन व्हॅली हिमालय राष्ट्रीय उद्यानापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. हे सुंदर ठिकाण पॅराग्लायडिंग, ट्रेक सारख्या साहसी क्रीडा प्रकारांसाठीही प्रसिद्ध आहे.
सोनमर्ग हे नवविवाहित जोडप्यांसाठी एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं. काश्मीरमधील पर्वतरांगा, बागा आणि विविध सरोवरं त्याच्या सौंदर्यात भर घालतात. काश्मीरमधला दल सरोवर जगप्रसिद्ध आहे. इथे देखील तुम्ही भेट देऊ शकता.
माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे. कामाच्या व्यापातून आराम आणि शांतता हवी असेल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. नाक्की सरोवर येथील सौंदर्यात भर घालते. हे ठिकाण पाहण्यासारखं आहे.
धार्मिक आणि निसर्ग सौंदर्यासाठी 'ऋषिकेश' खूप प्रसिद्ध आहे. गंगा घाट आणि कलात्मक मंदिरं हे या ठिकाणचं प्रमुख आकर्षण आहे. येथील मंदिरांत रात्री होणारी आरती पर्यटकांना आकर्षित करते असते. ऋषिकेशपासून जवळ असलेल्या शिवपुरीलाही तुम्ही भेट देऊ शकता.