तब्बूचे हे गाजलेले हे 8 सिनेमे तुम्ही पाहायलाच हवेत

kimaya narayan

तब्बू

बॉलिवूडमधील प्रतिथयश अभिनेत्री तब्बूचा आज 11 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. दमदार अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या तब्बूने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहे. आज जाणून घेऊया तब्बूच्या आवर्जून पाहायला हवेत अशा सिनेमांविषयी.

Tabu

अ सुटेबल बॉय

मीरा नायर दिग्दर्शित नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज अ सुटेबल बॉय या सीरिजमधील तब्बूची भूमिका खूप गाजली. स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट असलेल्या या सीरिजमध्ये रूप मेहरा या स्त्रीची गोष्ट दाखवण्यात आली होती जी तिची मुलगी लतासाठी सुयोग्य पती शोधत असते.

Tabu

अंधाधुन

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा अंधाधुन सिनेमातील तब्बूची भूमिका खूप गाजली. तब्बूबरोबर आयुष्मान खुरानाचीही मुख्य भूमिका होती. एक अंध पियानो वादक एका निवृत्त अभिनेत्याच्या खूव प्रकरणात कसा अडकतो याची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळाली.

Tabu

हैदर

राजकीय क्राईम थ्रिलर असलेला हैदर या सिनेमातील तब्बूची भूमिका चर्चेत राहिली. या सिनेमाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केलं होतं. तब्बूबरोबर शाहिद कपूर, के के मेनन, श्रद्धा कपूर आणि इरफान खान यांचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती.

दृश्यम

2015 मध्ये रिलीज झालेला सस्पेन्स थ्रिलर दृश्यम मधील तब्बूची भूमिका खूप गाजली. निशिकांत कामत यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. मल्याळम सिनेमा असलेल्या दृश्यमचा हा बॉलिवूड रिमेक होता ज्यात अजय देवगन आणि तब्बूची मुख्य भूमिका होती. तब्बूने साकारलेली लेडी पोलीस अधिकारी अनेकांना आवडली.

चिनी कम

अमिताभ बच्चन, तब्बू आणि परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेला चिनी कम हा सिनेमा खूप गाजला. 2007 साली हा सिनेमा कान फिल्म फेस्टिव्हलला प्रदर्शित करण्यात आला होता. आर बल्की यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

हेराफेरी

दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा गाजलेला हेराफेरी हा सिनेमा कुणीच अजूनही विसरु शकलेलं नाही. या सिनेमात तब्बूने साकारलेली अनुराधाची भूमिका सुपरहिट ठरली.

चांदनी बार

मधुर भांडारकर दिग्दर्शित चांदनी बार हा देखील तब्बूचा एक गाजलेला सिनेमा. मुंबई अंडरवर्ल्ड, वेश्या व्यवसाय आणि डान्स बार संस्कृती यावर भाष्य करणारा हा सिनेमा खूप गाजला. तब्बूबरोबर अतुल कुलकर्णीची या सिनेमात मुख्य भूमिका होती.

माचीस

गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला माचीस हा सिनेमासुद्धा तब्बूच्या चर्चेत राहिलेल्या सिनेमांपैकी एक. चंद्रचूड सिंह, ओम पुरी, तब्बू आणि जिमी शेरगील यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. शीख बंडखोरीच्या काळातील घटनांवर हा बेतलेला सिनेमा खूप चर्चेत राहिला होता.

गुलाबी पैठणीत मधुराणी दिसतेय मोहक - येथे क्लिक करा