कार्तिक पुजारी
पूनम पांडे हिने एका मुलाखतीमध्ये बाथरुममधला लीक झालेल्या तिच्या जुन्या व्हिडिओ बद्दल माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी पूनम पांडेचा बाथरुममधला व्हिडिओ लीक झाला होता. पूनमचा हा नवा पब्लिसिटी स्टंट असल्याचं त्यावेळी बोललं गेलं होतं.
पण, पूनमने याबाबत खुलासा केला आहे. तिने म्हटलंय की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने हा व्हिडिओ लीक केला होता.
पूनम म्हणाली की, आम्ही एकमेकांशी भांडलो होतो. मला त्याच्यापासून दूर जायचं होतं.
पूनमने सांगितलं की, एक्स बॉयफ्रेंडने तिचा व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली.
आताच्या आता तू परत ये. नाहीतर मी तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकेन, असं तो म्हणाला
एक्स बॉयफ्रेंडने खरंच तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. मला वाटलं नव्हतं की तो असं काही करेल, असं पूनम म्हणाली.