Anuradha Vipat
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्पोर्ट्स स्टार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सानिया खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
सानिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतीच सानियाने इन्स्टाग्राम स्टोरी एक पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
‘प्रतीक्षा… धैर्य ठेवा… जेव्हा तुम्ही विचार करता की आयुष्यात सर्व काही संपलं आहे, तेव्हा अल्लाह तुमच्या आयुष्यात असं काही पाठवतो… जे एखाद्या चमत्कारासारखं असेल…’ अशी पोस्ट सानियाने केली होती.
यावरुन आता सानियाच्या आयुष्यातील चमत्कार कोणी नवी व्यक्ती असू शकते असा अंदाज देखील अनेकांनी बांधला आहे.
सोशल मीडियावर सानियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.