N Chandrababu Naidu: किंगमेकर होणार किंग...

आशुतोष मसगौंडे

शपथविधी

तेलुगु देसम पार्टीचे सुप्रीमो एन चंद्राबाबू नायडू 12 जून 2024 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

N Chandrababu Naidu

चौथ्यांदा मुख्यमंत्री

चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. अमरावती येथे हा शपथविधी सोहळा पार पडणार असून, नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

N Chandrababu Naidu

मागच्या वेळी हॅट्रिक

यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांनी 1 सप्टेंबर 1995, 11 ऑक्टोबर 1999 आणि 8 जून 2014 अशा तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

N Chandrababu Naidu

2019 सत्ता गेली

2019 च्या विधानसभा निवडणुकीत वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी टीडीपीचा पराभव करून नायडूंकडून सत्ता हिसकावून घेतली.

N Chandrababu Naidu

नारा चंद्राबाबू नायडू

एन चंद्राबाबू नायडू यांचे पूर्ण नाव नारा चंद्राबाबू नायडू आहे. त्यांचा जन्म 20 एप्रिल 1950 रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील नरावरीपल्ली गावात झाला.

N Chandrababu Naidu

युवक काँग्रेसपासून सुरूवात

नायडू यांनी युवक काँग्रेसचे नेते म्हणून राजकारणाला सुरुवात केली. आणीबाणीनंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नायडू 1978 मध्ये चंद्रगिरीतून आमदार म्हणून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.

N Chandrababu Naidu

सुप्रसिद्ध अभिनेत्याचे जावई

सुप्रसिद्ध अभिनेते आणि टीडीपीचे संस्थापक एन टी रामाराव (एनटीआर) यांची मुलगी नारा भुवनेश्वरीशी लग्न केले.

N Chandrababu Naidu

टीडीपीमध्ये प्रवेश

लग्नानंतरही नायडू काँग्रेसमध्येच होते, पण 1983 च्या विधानसभा निवडणुकीत ते टीडीपीच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून टीडीपीमध्ये प्रवेश केला.

N Chandrababu Naidu

अन्वेशीचा जलवा! नव्या फोटोशूटनं उडवले होश

Anveshi Jain
आणखी पाहण्यासाठी...