नागा चैतन्य अन् शोभिताचा थाटात पार पडला साखरपुडा..! शोभिताच्या पारंपारिक लूकने वेधले लक्ष

Monika Lonkar –Kumbhar

शोभिता धुलिपाला

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री शोभिता धुलिपाला.

नागा चैतन्य

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य.

शोभिता-नागा

मागील कित्येक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी आज साखरपुडा करत त्यांच्या नात्याला नवीन सुरूवात केली आहे.

साखरपुडा

शोभिता आणि नागा चैतन्यचा आज साखरपुडा झाला असून, नागा चैतन्यचे वडिल अभिनेते नागार्जुन यांनी फोटो शेअर करत ही माहिती दिली.

दाक्षिणात्य लूक

शोभिताने साखरपुड्यासाठी ही सुंदर पीच कलरची साडी नेसली होती. या साडीवर तिने मिनिमल मेकअप आणि आकर्षक हेअरस्टाईल केली होती.

डायमंड रिंग

शोभिताने हातात गोल्डन बांगड्या घातल्या असून तिच्या बोटातील डायमंड रिंगने लक्ष वेधून घेतले.

ज्वेलरी

शोभिताने या सुंदर साडीवर मोती आणि कुंदनची ज्वेलरी कॅरी केली आहे. दोघांचे एंगेजमेंटचे फोटो व्हायरल झाले आहेत.

पीनट बटरचे सेवन केल्याने मिळतात भरपूर फायदे

Benefits of Peanut Butter | esakal
येथे क्लिक करा.