सकाळ डिजिटल टीम
अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा आज ८ ऑगस्टला साखरपुडा थाटात पार पडला.
गेला बराच काळ हे दोघं एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.
नागा चैतन्यचा या आधी लग्न साऊथ सुपरस्टार समांथाशी झालं होतं पण त्यांचा घटस्फोट झाला. पण तिचं नाव काही नागा चैतन्यचा पिच्छा सोडत नाहीये.
त्याची होणारी पत्नी आणि गर्लफ्रेंड शोभिता धुलिपालाच्या लहान बहिणीचं नावंही समांथा आहे.
शोभिताच्या बहिणीचं २ ० २ ३ या वर्षी लग्न झालं. सोशल मीडियावर शोभिताने फोटो शेअर केले होते.
समंथाचा नवरा साहिल दिल्लीचा असून त्यांचं लग्न साऊथ आणि नॉर्थ दोन्ही पद्धतीने झालं होतं. नागा चैतन्य बरोबर झालेल्या या योगायोगाने सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
शोभिता आणि नागा चैतन्य लवकरच लग्न करणार आहेत.