Anuradha Vipat
दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्य व अभिनेत्री सोभिता धुलीपाला यांचा साखरपुडा ८ ऑगस्ट रोजी पार पडला आहे
नागा चैतन्यचं यापूर्वी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी लग्न झालं होतं.
२०२१ मध्ये समंथा व नागा चैतन्यने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
आता यावर नागा चैतन्यचे वडील व ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाखतीत आपल्या मुलासाठी आनंदी असल्याचं नागार्जुन यांनी सांगितलं आहे.
नागार्जुन म्हणाले की, नागा चैतन्य आयुष्यात पुन्हा एकदा आनंदी झालाय. यासाठी मी प्रचंड खूश आहे. गेली काही वर्षे आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होती.
पुढे नागार्जुन म्हणाले की, समंथाबरोबर घटस्फोट झाल्यावर चैतन्य खूप दु:खी होता.